Advertisement

राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता

प्रजापत्र | Sunday, 25/09/2022
बातमी शेअर करा

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यामुळे ते राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी राजस्थान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. अशोक गेहलोत यांच्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे अशोक गेहलोत समर्थक आमदार नाराज झाले आहेत.

 

मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना निरीक्षक आणि प्रभारी म्हणून पाठवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह दोन्ही निरीक्षक हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह २५ आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.

Advertisement

Advertisement