Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर

प्रजापत्र | Saturday, 24/09/2022
बातमी शेअर करा

बीड : अखेर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सहकार मंत्री अतुल सावे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शिंदे-फडणविसांचे सरकार स्थापन झाल्यापासून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त होते. अखेर शनिवारी(दि.24) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करत बीड आणि जालना जिल्ह्याचा कारभार अतुल सावे यांच्यावर सोपविला आहे.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस यांनी सरकार सरकार स्थापन केल्यापासून अनेक जिल्हयातील पालकमंत्री पद रिक्त होते. मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला मात्र अद्याप दुसर्‍या विस्तारासाठी मुहूर्त मिळत नसल्याने अखेर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यात बीड आणि जालना जिल्हयाचे पालकमंत्री पद सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे सोपविण्यात आले. अतुल सावे हे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्य मंत्रीमंडळात सहकार मंत्री आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

 

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

 

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया

 

चंद्रकांत दादा पाटील – पुणे

 

विजयकुमार गावित- नंदुरबार

 

गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड

 

गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक

 

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम

 

सुरेश खाडे – सांगली

 

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

 

उदय सामंत – रत्नागिरी, रायगड

 

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

 

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग

 

अब्दुल सत्तार – हिंगोली

 

दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर

 

अतुल सावे – जालना, बीड,

 

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

 

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

Advertisement

Advertisement