Advertisement

चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग नजरकैदेत असल्याचा दावा

प्रजापत्र | Saturday, 24/09/2022
बातमी शेअर करा

दिल्ली : चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नजरकैदेत डांबण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी #XiJinping हॅशटॅगने हजारो ट्विट करण्यात आलेत. यात भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचाही समावेश आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चीनच्या सत्ताधारी साम्यवादी पक्षाने व ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तसंस्थेने अद्याप याची पुष्टी केली नाही किंवा फेटाळूनही लावले नाही.
माजी खासदार स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. चीन प्रकरणी एक नवी अफवा पसरली आहे. त्याची शहानिसा झाली पाहिजे. शी जिनपिंग यांना नजरकैदेत डांबण्यात आले आहे काय? जिनपिंग समरकंदच्या दौऱ्यावर असताना चिनी साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची लष्करप्रमुखपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांना नजरकैदेत टाकण्यात आल्याची अफवा पसरली आहे.

ली कियाओमिग नवे राष्ट्राध्यक्ष झाल्याचा दावा
चीनच्याही शेकडो यूजर्सनी देशात तख्तापालट झाल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदावरून हकालपट्टी करून सत्ता आपल्या हातात घेतली आहे. सध्या ली कियाओमिंग यांची नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Advertisement

Advertisement