Advertisement

केज-बीड रस्त्यावर अपघात

प्रजापत्र | Saturday, 24/09/2022
बातमी शेअर करा

केज : बस व दुचाकीचा धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी ( दि. २४ ) दुपारी घडली आहे. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.

 

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आज दुपारी केज-बीड रस्त्यावर कोरेगाव पाटी जवळ बन्सल क्लासेसची बस क्रमांक एम.एच. ४४ ९९९६ व दुचाकी क्रमांक एम.एच.१३ बी जे ८५७४ या दोन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात घडला यामध्ये भागवत कल्याण पवार, दिपक कल्याण पवार दोघे रा. कोरेगाव ( ता. केज ), सुनील मधुकर शिंदे रा. पिंपळगाव ( ता. केज ) हे तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच विजयप्रकाश ठोंबरे, नंदकिशोर मुंदडा, गौतम बचुटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. येथे उपचारादरम्यान सुनील शिंदे यांचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक असल्याचे दोघा पवार बंधुंना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले होते. येथे दिपक पवार यांचा मृत्यू झाला. भागवत पवार यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील दोघांच्या मृत्यू झाल्याची बातमी समजताच केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement