Advertisement

हातभट्टी दारू अड्डयावर पोलिसांकडून धडक कारवाई

प्रजापत्र | Saturday, 27/08/2022
बातमी शेअर करा

परळी शहर पोलिसांनी शनिवारी पहाटे धडाकेबाज कारवाई करत हातभट्टीचा अड्डे उध्वस्त केले, शहरातील वडसावित्री नगर भागात हातबट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी पहाटे हे अड्डे उध्वस्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

 

 

सविस्तर हकीकत अशी की, शनिवारी पहाटे अवैध हातभट्टीच्या दारू वर कार्यवाही करण्यात आली असून एकूण 520 लिटर किंमत 27100/- रुपयाचे रसायन नष्ट करण्यात आले. एकूण 3 आरोपी विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कार्यवाही पो. नी. कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, पो.ह/ 344 गित्ते, पोह/ 1551 कुंडगीर, पोना / 1741 घटमल पोकों 1439 राठोड यांनी केली.
 

Advertisement

Advertisement