Advertisement

पिकाला लावलेल्या तारेचा करंट लागुन 40 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 27/07/2022
बातमी शेअर करा

बीड दि.28 जुलै – गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथील शेतकऱ्याने रानडुकरा पासुन संरक्षण मिळावे यासाठी ऊसाला लावलेल्या तारेचा करंट लागुन मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. यात एक शेळीचा देखील शाॅक लागुन मृत्यू झाला.

 

 

नंदु उद्धव थोपटे (वय 40) राहणार अर्धामसला असे तारेचा करंट लागुन मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नावं आहे. ते मंगळवारी सांयकाळच्या सुमारास आपल्या शेतात काम करून घरी येत होते. यावेळी सोबत असलेली शेळी ऊसात गेली. ती शेळी पाहण्यासाठी गेले असता तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

 

अनेक भागात रानडुकरापासुन संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी तारेला करंट सोडतात. अशीच तार या ऊसाच्या फडाला लावलेली होती. त्याच तारेचा करंट लागुन शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. यात त्या शेळीचा देखील करंट लागुन मृत्यू झाला. मंगळवार रोजी रात्री शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
 

Advertisement

Advertisement