Advertisement

आज रात्री 12 वाजता आकाशात दिसणारा निसर्गाचा अद्भूत नजारा

प्रजापत्र | Wednesday, 13/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई : आज आहे 13 जुलै. आज गुरुपौर्णिमेच्या अद्भुत योग देखील आहे. मात्र आजच्या दिवशी आकाशात निसर्गाचा एक अद्भुत नजारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजची पौर्णिमेची रात्र ही खगोल प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. आज रात्री बारा वाजता आकाशात सुपरमून(Supermoon 2022) दिसणार आहे. नासाच्या(NASA) वेबसाईटवरही या सुपरमॅनच्या रात्रीचे लाईव्ह स्ट्रीमींग केले जाणार आहे. यामुळे आज रात्री निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहायला अजिबात विसरू नका. आजच्या सुपरमूनला ‘बकमून’ असे नाव देण्यात आले आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या दिवशी सुपरमून दिसतो. सुपरमून वर्षातून फक्त तीन ते चार वेळा दिसतो. 2022 चा पहिला सुपरमून जूनमध्ये होता. वर्षातील तिसरा आणि शेवटचा सुपरमून ऑगस्टमध्ये दिसणार आहे. त्यानंतर तो 18 सप्टेंबर 2024 रोजी दिसणार आहे.

 

 

प्रमुख खगोलशास्त्रीय घटना म्हणजे सुपरमून
अंतराळाबद्दल नेहमीच खगोलप्रेमींना आकर्षण असते. अंतराळातील रहस्ये उघड करण्याच्या उद्देशाने खगोलशास्त्रज्ञ नेहमीच सर्व खगोलीय घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. प्रमुख खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक आहे ती सुपरमून. पौर्णिमाच्या दिवशी सुपरपून पहायला मिळतो. यापूर्वी 14 जूनला दिसलेल्या सुपर मूनला स्ट्रॉबेरी मून असे नाव देण्यात आले होते. स्ट्रॉबेरी कापणीच्या वेळी पौर्णिमा आल्याने याला स्ट्रॉबेरी मून म्हणून संबोधण्यात आले. याआधी जूनमध्ये सुपरमून दिसला होता. यानंतर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुपरमून पहायची संधी मिळत आहे.

 

 

आजच्या सुपरमूनला ‘बक मून’ नाव का देण्यात आले?
आजच्या पौर्णिमेला दिसणाऱ्या सुपरमूनला ‘बक मून’ असे नाव देण्यात आले आहे. मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटी डीअर इकोलॉजी अँड मॅनेजमेंट लॅबच्या अहवालानुसार, जून आणि जुलैच्या काळात नर हरणांची शिंगे खूप वेगाने वाढतात. सुपरमूनच्या वेळी ज्याप्रमाणे चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वात मोठ्या आकारात दिसतो, त्याचप्रमाणे हरणांचे शिंगे त्यांच्या मोठ्या आकारात वाढू शकतात. म्हणूनच जुलैमध्ये पडणाऱ्या सुपरमूनला बक मून म्हणतात आणि त्याचा हरणांशी विशेष संबंध आहे.

 

 

रात्री 12 वाजता आकाशात दिसणार अद्धभूत नजारा
आज म्हणजेच 13 जुलै रोजी आषाढ महिन्याची पौर्णिमा आहे. या दरम्यान चंद्र खूप तेजस्वी दिसणार आहे. आजच्या दिवशी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर खूपच कमी होणार आहे. चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर फक्त 3,57,264 किमी इतके असणार आहे. चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. यामुळेच आजच्या रात्री चंद्राचा आकार सामान्यपेक्षा मोठा दिसणार आहे. रात्री 12.07 च्या सुमारास या सुपरमूनचे दर्शन घडेल. रात्री 12.07 वाजल्यापासून अगदी पहाटे पर्यंत म्हणजेच 2 ते 3 तास हा सुपरमून दिसणार आहे. नासाच्या वेबसाइटवर किंवा त्याच्या ट्विटर अकाउंटवरही या सुपरमूनचे live streaming होणार आहे.
 

Advertisement

Advertisement