Advertisement

सिलेंडरनंतर आता सीएनजी आणि पीएनजीही महाग

प्रजापत्र | Tuesday, 12/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई :  सर्वसामांन्यांना आणखी एक झटका देणारी बातमी आहे. प्रामुख्याने सीएनजी आणि पीएनजी वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महानगरकडून पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. (mahanagar gas hike cng prices 4 rupees and png 3 rupees new rate will be aplicable to today midnight)

 

 

सीएनजी 4 तर पीएनजी 3 रुपयांनी महाग झालंय. या दरवाढीमुळे आता पीएनजीचे नवे दर हे 48 रुपये 50 पैसे, तर सीएनजी 80 रुपये प्रति किलो असणार आहे. या वाढीव दरांमुळे आता सर्वसामांन्याना खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. 
 

Advertisement

Advertisement