Advertisement

पालिका निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध तयारीला लागावे

प्रजापत्र | Tuesday, 12/07/2022
बातमी शेअर करा

परंडा (प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्या निवासस्थानी झाली.

        बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार राहुल मोटे म्हणाले की, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी मागील पाच वर्षात परंडा शहरामध्ये उत्तम प्रकारे काम करू शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात परंडा नगर परिषदेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेतला आहे. निवडणुका या वेळेवरच होतील. त्यामुळे कार्यकर्त्यांना नियोजनबध्द निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राहुल मोटे यांनी केले.

 माजी नगराध्यक्ष सौदागर म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये २० पैकी २० जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निवडून येतीला याची मला खात्री आहे. सर्व समाजघटकाला सोबत घेऊन आपण नगर परिपदेची निवडणुक लढवणार आहोत. शहरातील अनेक विकासकामे केली आहेत व पुढे आणखी करावयाची आहेत. याप्रसंगी सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे व शहराध्यक्ष वाजीद दखनी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विश्वजीत राहुल मोटे, शेरूभाई सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, नवनाथ जगताप, मसरत काझी, गोवर्धन शिंदे, धनाजी जाधव, जिल्हा मदर फेडरेशनचे संचालक बापू मिस्किन, धनंजय हांडे, बाणगंगा सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक भाऊसाहेब खरसडे, माजी नगरसेवक सरफराज कुरेशी, संजय घाडगे, बब्बू जिनेरी, राजा माने, शरीफ तांबोळी, आप्पा बनसोडे, जयंत शिंदे, पिंटू पाटील, सुभाष मारकड, जावेद मुजावर, तन्नू मुजावर, संजय पवार, दीपक भांडवलकर, अनिल पाटील, महेश खुळे, पिंटू काळे, मलिक सय्यद, महेश पाटील, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका उपाध्यक्ष बंडू रगडे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्ता माळी, रामदास गवारे यांच्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement