Advertisement

यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये मार्गदर्शन सुविधा केंद्र सुरु

प्रजापत्र | Thursday, 16/06/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१६ (प्रतिनिधी)-मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअरींग पदविका प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 प्रवेश प्रक्रियेसाठी तसेच मार्गदर्शनासाठी सुविधा केंद्राचे उद्घाटन तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री नितीन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

       इंजिनिअरींग पदविकेच्या प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया २०२२-२०२३ साठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी महाराष्ट्रात एफ. सी. सेंटरची स्थापना केलेली आहे. दरम्यान या मार्गदर्शन सुविधा केंद्राचा विद्यार्थी आणि पालकांना मोठा फायदा होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एम.गायकवाड,प्रवेश केंद्राचे समन्वयक जी.एन.धसे,बी.ए.केंदे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement