Advertisement

अन् धनंजय मुंडेंना आवरला नाही फोटोग्राफीचा मोह

प्रजापत्र | Friday, 10/06/2022
बातमी शेअर करा

बीड-कधीही न झोपणारी मुंबई, हॉर्नचा कर्कश आवाज, जिथे तिथे ट्राफिक, जो तो आपल्या कामात व्यस्त, ना कधी निसर्गाचा आनंद घ्यायचा, ना कधी वेळ काढून फेरफटका मारायचा, ज्याला त्याला केवळ पुढे जायचे त्याचे नावच मुंबई महानगरी. काल पावसाच्या सरी झाल्या आणि आज सकाळी उगवणार्‍या सुर्याने जणू मुंबई महानगरीला उजळून काढले. निळे भोर आकाश, शांत सागर आणि उंच उंच दिसणार्‍या इमारती, याची देही याची डोळा ज्याने आत्मीक होवून पाहिल्या. त्याच्या डोळ्याचे पारणे फिटले, असाच अनुभव राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आला आणि त्यांना आपल्या गाडीतून जाताना या मनमोहक दृश्याच्या फोटोग्राफीचा मोह आवरला नाही. मुंडेंनी फोटोग्राफी केली, व्हिडीओग्राफी केली आणि थेट सोशलमिडीयावर पोस्ट करत हे मोहक रूप पाहून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नसल्याचे सांगितले.

 


     

जगाच्या पाठीवर सर्वात धावणारे शहर म्हणजे मुंबई. प्रत्येकजण व्यस्त असणारे महानगर म्हणजे मुंबई. ही अजाग्र महानगरी राजा आणि रंकालाही आपल्या कुशीत घेते. गरिब श्रीमंतालाही मांडीवर बसवते. त्या शहराचे मनमोहक रूप कसे असते? ते धनंजय मुंडेंनी आजच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ते म्हणातात, नेहमी ट्राफीक आणि घाई गर्दीच्या विळख्यात असलेल्या मुंबई शहराचे कालच्या हलक्या पावसानंतर सुंदर रूप आज पहायला मिळाले. स्वच्छ निरभ्य आकाश, शांत सागर आणि उंच उंच इमारती, हे मोहक रूप पाहून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. असे म्हणत त्यांनी दोन व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केल्या आहेत. कामाच्या व्यस्ततेतुन धनंजय मुंडेंनी आपल्या आवडी निवडी जपून ठेवल्याचे यातून दिसून येते.
 

Advertisement

Advertisement