Advertisement

पालीच्या तलावात आढळला महिलेचा मृतदेह

प्रजापत्र | Wednesday, 08/06/2022
बातमी शेअर करा

बीड-तालुक्यातील पाली येथील तलावात एका महिलेचा मृतदेह बुधवारी (दि.८) सकाळी आढळून आला आहे.बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह तलावाच्या बाहेर काढण्यात येत आहे. 
             सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेचे नाव सुनीता असल्याचे कळते.मंगळवारी (दि.७) रात्री या महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पोलीस तपासातून खरे कारण समोर येईल.आज दुपारी १२ च्या सुमारास गावातील लोकांना एका महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना दिसल्यानंतर ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली.दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती आहे.  

 

Advertisement

Advertisement