Advertisement

संशयास्पद अवस्थेत आढळला तरुणाचा मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 08/06/2022
बातमी शेअर करा

बीड-शहरात पुन्हा एकदा बुधवारी (दि.८) सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे.एका २७ वर्षीय तरुणाचा बार्शी रोडवरील स्वराज नगर परिसरात संशयास्पद मृत्यु आढळून आला आहे. 
  अक्षय भांडवले (वय-२७ रा.स्वराज्य नगर) असे त्या तरुणाचे नाव आहे.आज सकाळी अक्षयचा मृतदेह स्वराज्यनगरमधील मारुती-सुझूकी शोरुमच्या जवळ संशयास्पद स्थितीत आढळून आला. अक्षयच्या मृतदेहाजवळ शिवाजी नगर पोलिसांना एका पिस्टल आढळून आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.दरम्यान अक्षयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून थोड्यावेळात मृत्यूचे कारण समोर येणार आहे. 

Advertisement

Advertisement