Advertisement

राहत्याघरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 27/05/2022
बातमी शेअर करा

बीड - शहरातील कॅनाल रोड भागात राहणार्‍या एका 45 वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. सदरील महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

 

 

सुवर्णा सुनील जाधव (वय 45 वर्षे, रा. कॅनाल रोड) या महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरामध्ये आढळून आला. सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Advertisement

Advertisement