Advertisement

सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

प्रजापत्र | Thursday, 05/05/2022
बातमी शेअर करा

अशोक सुरासे 
तलवाडा-येथून जवळच असलेल्या रामपुरी गावामध्ये एका ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपी फरार असल्याची माहिती आहे.  


         सुंदर तायड (वय-२५ रा.रामपुरी) याने बुधवारी रात्री ११ च्या सुमारास गावातील एका महिलेच्या घराबाहेर चकरा मारत असल्याने त्या महिलेने सुंदरला घराजवळून हाकलून दिले.मात्र मध्यरात्री १२ च्या सुमारास सुंदर पुन्हा दारूच्या नशेत आल्यामुळे पीडितेच्या आईने घराजवळील आपल्या भावाला झोपेतून उठविण्यासाठी गेल्या असता सुंदरने सहा वर्षीय चिमुरडीला घरातून उचलून अज्ञातस्थळी नेले.त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तो फरार झाला.याप्रकरणी गुरुवारी रात्री पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.याप्रकारणाचा तपास पिंक पथक प्रमुख अर्चना भोसले या करणार आहेत.

Advertisement

Advertisement