Advertisement

मुलीच्या हळदीचा आनंद ठरला औटघटकेचा

प्रजापत्र | Saturday, 23/04/2022
बातमी शेअर करा

बाबूराव जेधे 

वडवणी- तालुक्यातील टोकेवाडी येथील लग्नाचा मंडप उभारताना विद्युत तारेचा करंट लागून नवरी मुलीच्या वडिलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 मुलीला हळद लागली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

     टोकेवाडी येथील हनुमंत अंबादास डोंगरे (वय-३४)

असे त्या मयताचे नाव आहे. हनुमंत डोंगरे यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह हिवरापाडी येथील एका तरुणासोबत ठरवला होता. शुक्रवारी मुलीला हळद लावण्यात आली. त्यानंतर अगदी लग्नाची जय्यत तयारी दोन्ही कुटुंबाकडून होती. विवाह मंडपाला विद्युत तारेचा करंट लागल्यामुळे मंडपात अँगलच्या जवळ बसलेली व उभे राहिलेल्या सात ते आठ जणांना विजेचा धक्का बसला यात काहीजण या धक्क्याने बाजूला फेकले गेले मात्र नवरीच्या बापाला एवढा जबर धक्का बसला की ते जागीच मृत्यू पावले.काही क्षणातच या लग्न सोहळ्यावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथे आणला असून मृतदेहाचे शवविच्छेदन इथेच करण्यात आले. नंतर मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement