Advertisement

लग्नानंतर आठ दिवसात नवरी पसार; नवरीसह पाच जणांवर गुन्हा

प्रजापत्र | Tuesday, 12/04/2022
बातमी शेअर करा

गेवराई - दोन लाख घेतल्यानंतर नवरीसह तिच्या नातेवाईकांनी लग्नाला होकार दिला. यानंतर मुलाकडील मंडळीने स्वखर्चाने मोठ्या उत्साहात लग्न समारंभ देखील पार पाडला. मात्र लग्नाच्या आठ दिवसानंतर नवरी मुलगी माहेरी म्हणून गेली. नंतर कारणांवर कारण सांगत ती परत आलीच नाही. तर सदरील नवरी मुलीचा मोबाईल काही दिवसांनी बंद झाला. तसेच तिचा यापूर्वी विवाह झालेला असून तिला दोन अपत्य असल्याने मुलाकडील मंडळींना कळल्याने त्यांना धक्काच बसला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवरदेव मुलाच्या फिर्यादीवरून नवरी मुलीसह पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

   गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले. दरम्यान नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख देत असाल तर लग्नास सहमती दर्शविली. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख 60 हजार व 1 लाख 40 हजाराचा धनादेश दिल्यानंतर गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात दि.20 जुलै 2021 रोजी लग्न समारंभ पार पडला. दरम्यान दिलेला धनादेश आठ दिवसांत विड्राल होताच नवरी मुलगी रेखा हि माहेरी गेली. यानंतर वेळोवेळी वेगवेगळे कारणे देत ती परत आलीच नाही. यानंतर काही दिवसांनी तिचा मोबाईल बंद झाला. तर तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य देखील असल्याचे नवरदेव मंडळींना कळताच त्यांना धक्काच बसला त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापी या यांना संपर्क साधला असता त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा म्हणून कुठे फोन कट केला याप्रकरणी नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे यांच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे सुनिता बाळू चौधरी रेखा बाळू चौधरी राहणार जाधव वाडी औरंगाबाद सिडको रामकिसन जगन्नाथ तापडिया राहणार सालवडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर व विठ्ठल किसन पवार राहणार सावरखेडा औरंगाबाद गंगापूर या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात कलम 420 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल साजिद सिद्दिकी हे करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement