Advertisement

लाचखोर तलाठ्यास दोन वर्षांचा कारावास

प्रजापत्र | Tuesday, 12/04/2022
बातमी शेअर करा

माजलगाव - दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला तत्कालीन तलाठी रवींद्र वसंतराव मडकर यास माजलगाव अति.सत्र न्या. अरविंद वाघमारे यांनी दोन वर्ष सध्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. 

 

 

अकरा वर्षापूर्वी हे प्रकरण घडले होते. २०११ साली तलाठी रवींद्र मडकर यास २ हजार रुपयांची लाच घेताना माजलगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले होते. बीड एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली होती. याप्रकरणी रवींद्र मडकर याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून माजलगाव न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी अति.सत्र न्या. अरविंद वाघमारे यांच्या न्यायालयासमोर झाली. उपलब्ध साक्षी पुरावे तपासून न्या. वाघमारे यांनी रवींद्र मडकर यास दोषी ठरवून दोन वर्ष साधा कारावास व एकूण ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता रणजीत वाघमारे यांनी कामकाज पाहिले. त्यांना एसबीचे पोलीस निरिक्षक अमोल धस, अंमलदार सुदर्शन निकाळजे यांनी मदत केली.

Advertisement

Advertisement