Advertisement

तपासणी अधिकारी पोहोचताच नेकनुरातील   मेडिकल वाल्यांनी ठोकली धूम

प्रजापत्र | Thursday, 10/03/2022
बातमी शेअर करा

 अशोक शिंदे

नेकनूर:    बीड तालुक्यातील नेकनूर येथील   मेडिकल वाल्यांच्या करामती एक एक पुढे येऊ लागल्या आहेत ,कोरोना काळात हेच मेडिकल वाले डॉक्टर असल्यासारखे गोळ्या औषध अव्वाच्या सव्वा भावाने ग्राहकांच्या माथी मारत होते , आता ह्याच नेकनूर मधील मेडिकल वाल्यांनी आज मात्र तपासणी अधिकारी नेकनुरात पोहोतच सर्वच मेडिकल दुकान दारांनी मेडिकल बंद ठेवून धूम ठोकल्याने मेडिकल वाल्यांचा दुकानदारी वर प्रश्न उपस्थित केला जात आहे असे असताना नेमकं ह्या मेडिकल मध्ये दाल मे कुछ काला है क्या पुरी दाल काली अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे. 

एखाद्या नागरिकांची तब्येत बरोबर नसली की तेच नागरिक गोळ्या औषधं घेण्यासाठी मेडिकल वर गेल्यानंतर डॉक्टर ची गरज नाही , मेडिकल वालेच सर्व दुखण्यावर लगेच गोळ्या औषध देऊन अव्वाच्या सव्वा पैसे उखळले जातात ,विशेष बाब म्हणजे या बिलात एक रुपयाही कमी होत नाही , असे असतांना मेडिकल वाल्यांकडे तपासणी अधिकारी पोहोचले असताना त्यांनी मेडिकल बंद ठेवायचे कारण काय ? नेमकं या धंद्याच्या मागे दडलंय तरी काय असेच एक ना अनेक प्रश्न सध्या नेकनुरात चर्चिले जात आहेत

Advertisement

Advertisement