Advertisement

धारुर तालुक्यात वणवा पेटला

प्रजापत्र | Monday, 21/02/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.21 फेब्रुवारी – धारुर (Dharur) तालुक्यातील खामगाव - सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूला असणाऱ्या डोंगराला सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे हजारो झाडे जळून खाक झाली. आसपासच्या ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

 

( Wildfire erupts in Dharur taluka; Burn thousands of trees on the mountain. )

 

तालुक्यातील खामगाव - सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील  (NH-548C ) आरणवाडी साठवण तलावाच्या पूर्वेस  रस्त्याचे वरील बाजूस शासकीय गायरान (Government Land) असलेल्या डोंगरास सोमवारी दुपारी बारा ते साडे बाराच्या दरम्यान अचानक आग लागली. या लागलेल्या आगीमुळे चार ते पाच एक्कर डोंगर जळून खाक झाला.

 

या डोंगरावरील सर्व वनराई नष्ट झाली असून वणवा (Wildfire) वाढतच आहे. या डोंगरावरील सिताफळ ( Custard apple ) व इतर झाडे जळून खाक झाली. यामुळे मोठे नुकसान झाले. ही आग अटोक्यात आणण्यासाठी आसपासच्या ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मात्र तत्पूर्वीच आगीमुळे मोठे नुकसान झाले होते.

 

रस्त्याचे बाजूलाच हा डोंगर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनातील प्रवाशी थांबून ही घटना पाहात होते. या आगीमुळे वृक्षासह वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात येत आहे असे वाटत असताना सायंकाळी या आगीने भंयकर रुप धारण केले होते. रात्रीतून हवेमुळे आग परिसरातील अन्य डोंगरावर पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement