Advertisement

गेवराई तहसीलदारांवर गुन्हा

प्रजापत्र | Saturday, 19/02/2022
बातमी शेअर करा

गेवराई-महिलेच्या घरात घुसून धमाकावल्याप्रकरणी गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कुसूम शिवाजी मोटे, स्वाती सोमनाथ गिरगे, सुनीता सुरेश भुंबे (सर्व रा.गेवराई) अशी फिर्यादी महिलांची नावे आहे. या महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तहसीलदार सचिन खाडे हे सहा ते सात जणांना सोबत घेऊन आमच्या घरी येत तुम्ही वाळू प्रकरणातील आरोपी लपवून ठेवले असे म्हणत धमकावले असल्याची फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान गेवराई पोलीस ठाण्यात याप्रकारणी खाडेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणाचा  पुढील तपास सपोनि.संदीप काळे हे करत आहेत.

 

गुन्हा दाखल करण्यात वाळू माफियांचा हात?
दरम्यान गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांना सोमनाथ गिरगे यासह अन्य दोन वाळू माफियांनी गुरुवारी घरी जाऊन धमकावले होते.तसेच तहसिलला जाण्यापासून अडविले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गुरुवारी वाळू माफियांवर नोंदविण्यात आला होता. यानंतर शुक्रवारी सकाळी वाळू माफिया सोमनाथ गिरगे यांच्या पत्नीने गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन खाडे यांच्यावर घरात घुसून धमाकावल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणात  वाळू माफियांचा हात असल्याची चर्चा सुरु आहे.

Advertisement

Advertisement