Advertisement

भारतात अनेक ठिकाणी एअरटेलची सेवा ठप्प

प्रजापत्र | Friday, 11/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई : भारतात विविध ठिकाणी एअरटेलच्या ब्रॉडबँड  आणि मोबाईल सेवा सध्या बंद असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. भारतातील विविध ठिकाणचे अनेक युजर्स एअरटेलच्या नेटवर्क आउटेजची  ट्विटरवर तक्रार करत आहेत. तर बहुतांश युजर्स एअरटेलच्या ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार करत आहेत. ऑनलाइन अहवाल सूचित करतात की, ही समस्या व्यापक असू शकते आणि एअरटेल मोबाइल इंटरनेट आणि कंपनीच्या ब्रॉडबँड तसेच वाय-फाय सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाइन अहवाल सूचित करतात की एअरटेल चे अॅप देखील या क्षणी काम करत नाही. दरम्यान, कंपनीने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन अहवाल सूचित करतात की दिल्ली, मुंबई, नोएडा आणि इतर अनेक ठिकाणी फायबर इंटरनेट, ब्रॉडबँड, तसेच मोबाइल नेटवर्कचे सर्व एअरटेल कनेक्शन बंद आहेत. आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार एअरटेल इंटरनेटला शुक्रवारी, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून समस्या येत आहेत. Downdetector च्या मते, संपूर्ण भारतात 11:18 पर्यंत 3,729 युजर्सनी त्यांच्या कनेक्शनमध्ये आउटेज झाल्याची तक्रार नोंदवली होती. अनेक युजर्सनी सांगितले की, या महिन्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे.

 

जाहिरात

कोरोनाग्रस्तांचा सारथी: विजयसिंह (बाळा) बांगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक-विजयसिंह (बाळा) बांगर मित्र मंडळ

https://youtu.be/0ftb8uuE7ZE

 

 

जियोपेक्षा मोठी समस्या?
एअरटेलची स्पर्धक कंपनी असलेल्या जिओला मुंबई विभागात गेल्या आठवड्यात अशाच पद्धतीच्या तक्रारींचा सामना करावा लागला होता. मात्र एअरटेल आउटेज खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहे, कारण डाउनडिटेक्टरवरील आउटेज नकाशा देशभरातील आउटेज दर्शवितो. जियोला केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात आउटेजचा सामना करावा लागला होता.

Advertisement

Advertisement