Advertisement

सोयाबीन चोरणारे चौघे गजाआड

प्रजापत्र | Monday, 31/01/2022
बातमी शेअर करा

बीड - पात्रुड येथील एका शेतकर्‍याचे 39 पोते सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास माजलगाव पोलीस करत असताना त्यांनी काल दोन आरोपींसह चोरीस गेलेला पुर्ण मुद्देमाल आणि आरोपींनी चोरीसाठी वापरलेला टेम्पो जप्त केला. ही कारवाई एपीआय जोनवाल आणि त्यांच्या टिमने केली.

 

 

पात्रूड येथील कुलदीप इंद्रजीत शिंदे या शेतकर्‍याने आपल्या शेतात सोयाबीनची काढणी करून 39 पोते सोयाबीन भरून ठेवली होती. ती 21 ऑक्टोबर 2021 रोजी चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी त्यांनी माजलगाव पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल हे करत होते. गेल्या काही दिवसांपुर्वीच त्यांनी या प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या बांधल्या होत्या. त्यानंतर काल पुन्हा दोन आरोपी पकडण्यात आले. त्यांच्याकडून पुर्ण माल हस्तगत करण्यात आला. त्यांनी तो माल लातूर येथील व्यापार्‍याला विकला होता. त्या व्यापार्‍याकडून पोलिसांनी तो माल ताब्यात घेतला. या वेळी चोरट्यांनी अशोक लिलँड कंपनीचे पिकअप क्र. एम.एच. 23 ए.यू. 3186 हा सोयाबीन चोरीसाठी वापरला होता. ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. सोयाबीन आणि पिकअप असा एकूण साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काल पोलिसांनी शेख महेबूब शेख रशीद (वय 20) व सईद इनामदार (वय 24) दोन्ही रा. पात्रुड यांना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले तर अद्याप चार आरोपी फरार आहेत. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, डीवायएसपी सुनिल जायभाये, माजलगावचे पो.निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, ढोबळे, थोटे , ऐटवाड, संजय राठोड, विलास खराडे यांनी केली.

Advertisement

Advertisement