Advertisement

केज पोलिसांनी देशी विदेशी सह गावठी दारू पकडली

प्रजापत्र | Saturday, 25/12/2021
बातमी शेअर करा

केज दि.२५ - केज तालुक्यातील ग्रामीण भागात देशी विदेशी दारूचा धंदा फोफावत असून अनेक अल्पवयीन तरुण दारूच्या आहारी जात आहेत.अश्याच एका दारू अड्ड्यावर केज पोलिसांनी छापा मारून देशी विदेशी सह सुमारे 7 हजारांची गावठी दारू जप्त केली आहे.

 

 

        तालुक्यातील कानडी माळी येथे एपीआय संतोष मिसळे, फौजदार दादासाहेब सिद्धे यांच्यासह पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे, दिलीप गित्ते यांनी दोन ठिकाणी छापा मारून देशी संत्रा, टॅनंगो पंच, मॅक्डोल,ऑफीसर चॉईस,मॅक्डोल रम तसेच 20 लिटर गावठी दारू जप्त केली तर सुमारे25 हजारांचे रसायन नष्ट केले आहे.

 

 

                  पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे व दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून सुवर्णमाला देविदास काळे व जिजाबाई सोमनाथ काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement