Advertisement

३०० ब्रास वाळू जप्त

प्रजापत्र | Friday, 24/12/2021
बातमी शेअर करा

केज दि. 24 – सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे पिंपळनेर जि. बीड हद्दीत मौजे ब्रामपुर येथे 03.00 वाजता वाळू अड्ड्यावर रेड मारून तीन ट्रॅक्‍टर  दोनशे ते तीनशे ब्रास वाळू जप्त करून पोलीस ठाणे पिंपळनेर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्या ताब्यात दिले.

 

 

               सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक बीड, सा. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिस शेख बालाजी दराडे, जस्वंत सेत, राजू वंजारे सचिन हंकारे, हुम्बे यांनी केली.तसेच पोलिस ठाणे वडवणी हद्दीत चिंचवण रोडवर रेल्वे ब्रिज खाली 07.00 वाजता वाळूने भरलेला ट्रॅक्टर मिळून आल्याने सदरचे ट्रॅक्टर पोलीस ठाणे वडवणी येथे लावून ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याविरुद्ध कलम 379 प्रमाणे पोलीस ठाणे वडवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement