Advertisement

अवैध वाळू उपसा प्रकरणी महसूलची कारवाई

प्रजापत्र | Sunday, 19/12/2021
बातमी शेअर करा

गेवराई : गेवराई तालुक्यातील गोपत पिंपळगाव याठिकाणी आज पहाटे महसूल पथकाने धाड टाकून अवैध वाळू उपसा करणारी एक जेसीबी तसेच केनीसह एक ट्रँक्टर ताब्यात घेतले. हि कारवाई कारवाई उपविभागीय अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने केली.

 

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभाग सातत्याने कारवाई करत आहे. मात्र कारवायांना वाळू माफिया भिक घालत नसल्याने दिसून येते. एकीकडे कारवाया होत असताना दुसरीकडे वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. तालुक्यात एकही अधिकृत टेंडर नसताना हजारो बांधकामांवर हि चोरट्या मार्गाने वाळू पुरवली जात आहे, हे विशेष.

 

दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोपत पिंपळगाव याठिकाणी महसूल विभागाने धाड टाकली. यावेळी गोदावरीतून वाळू उपसा करणारी एक जेसीबी, एक केनीसह ट्रँक्टर या पथकाने ताब्यात घेतले. हि कारवाई उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, मंडळ अधिकारी परमेश्वर सानप, नामदेव खेडकर, जितेंद्र लेंडाळ, तलाठी परमेश्वर काळे, अशोक डरफे, अविनाश लांडे, विकास ससाणे, राजाभाऊ सानप, गजानन देशमुख, कोतवाल कुंदन काळे, शुभम गायकवाड, गजानन शिंगणे आदींनी केली. चार दिवसांपूर्वीच या पथकाने सुरळेगाव याठिकाणी दोन हायवा वाळूसह ताब्यात घेत 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

Advertisement

Advertisement