Advertisement

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई

प्रजापत्र | Tuesday, 14/12/2021
बातमी शेअर करा

मुंबईत एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीला 13 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात यश आला आहे. एनसीबीने मुंबईत 8 ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. त्यात हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून ड्रग्जची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलँडला हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते. याप्रकरणी एनसीबीकडून एकूण सहा गुन्हे नोंद केले आहेत.

 

 

एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेल्या कारवाईबद्दल सविस्तर खुलासा केला आहे. ख्रिस्मस आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी मुंबईत ड्रग्स तस्कर सक्रीय झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे वानखेडेंनी सांगितले आहे.

 

एनसीबीने मुंबईतील अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे आणि पेडलर्सविरुद्धच्या सततच्या मोहिमेंतर्गत मुंबईच्या विविध ठिकाणी अनेक सर्च ऑपरेशन्स सुरू केले आहेत. 1 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत एकूण 2.296 किलो ऍम्फेटामाइन, 3.906 किलो अफू आणि 2.525 किलो

Advertisement

Advertisement