Advertisement

‘त्या’ खूनातील आरोपीस कोठडी

प्रजापत्र | Tuesday, 14/12/2021
बातमी शेअर करा

परळी दि.14 डिसेंबर – परळी तालुक्यातील सिरसाळा येथे मेंढ्यांच्या विक्री व्यवहारातील 11 लाख रुपयांसाठी तगादा लावल्याने मेंढपाळाची बतईने गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात दुसऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास 18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली.(Custody of the accused in ‘that’ murder; Fork removed from money transactions.)

 

 

सिरसाळा पोलिसांनी (Police) सदरील हत्या (Murder) प्रकरणात एका आरोपीला जेरबंद केले होते. या प्रकरणातील सूत्रधाराला पोलिसांकडून रविवारी माजलगाव येथे बेड्या ठोकण्यात आल्या. भालचंद्र ऊर्फ पिंटू हेगडकर असे या सूत्रधाराचे नाव आहे.मेंढपाळ असलेले चंद्रकांत देवकते यांनी 11 लाख रुपये किमतीच्या 50 मेंढ्या भालचंद्र उर्फ पिंटू रामकिसन हेगडकर (35, रा. ममदापूर, ता.अंबाजोगाई) यास विक्री केल्या होत्या. या दोघात दिवाळी पाडव्यापर्यंत 11 लाख रुपये देण्याचा तोंडी करार झाला होता.

 

 

मात्र, दिवाळी पाडवा होऊनही हेगडकर पैसे देत नसल्याने चंद्रकांत देवकते हा त्यास वारंवार पैशाची मागणी करत होता. यातून हेगडकर याने अन्य तीन मित्रांना सोबत घेऊन चंद्रकांत देवकते यांची हत्या करत प्रेत परळी तालुक्यातील वांगी येथील तलावात फेकले होते.चौघांपैकी भागवत सखाराम उजगरे यास सिरसाळा पोलिसांनी 9 डिसेंबर रोजी दिंद्रूड येथून ताब्यात घेतले असून तो सध्या कोठडीत आहे. तर भालचंद्र ऊर्फ पिंटू हेगडकर याला पोलिसांनी माजलगावातून अटक (arrested) केली. त्यास सोमवारी माजलगाव सत्र न्यायालयात हजर केले असता 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक (API) प्रदीप एकशिंगे यांनी दिली.

 

 

काय आहे प्रकरण…
परळी (Parli) तालुक्यातील वांगी तलावात एका तरूणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. धारदार शस्त्राने खून करून मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाची ओळख पटवून तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते.

पोलिसांनी अवघ्या 24 तासात खुनाचा उलगडा करून मृतदेहाची ओळख पटवीली. मेंढ्या खरेदी-विक्री व्यवहारातून व पैशाच्या देवाण-घेवाणीवरून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सिरसाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मेडीयाच्या (Social Media) माध्यमातून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावून आरोपी जेरबंद केले.
 

Advertisement

Advertisement