Advertisement

'या' IIT च्या विद्यार्थ्याला २ कोटी रुपये पगाराच्या पॅकेजची ऑफर!

प्रजापत्र | Wednesday, 01/12/2021
बातमी शेअर करा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी,मध्ये प्लेसमेंट प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एका विद्यार्थ्याला चक्क दोन कोटी रुपयांचं पॅकेट असणाऱ्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. ही ऑफर अमेरिकेतील सॅनफ्रन्सिस्कोच्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीने दिली आहे. पहिल्याच दिवशी एका विद्यार्थ्याला इतकी मोठी ऑफर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कॅम्पसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

 

आयआयटी बीएचयूमध्ये सध्या प्लेसमेंट ड्राइव्ह सुरू आहे. यंदा एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला आहे. काही विद्यार्थ्यांनी तर स्वत:च कॉम्प्युटर, लॅपटॉप लावून प्लेसमेंट ड्राइव्हचं आयोजन केलं आहे.

 

 

प्लेसमेंट ड्राइव्ह २४ तास सुरू आहे. कारण काही बहुराष्ट्रीय कंपन्या देखील आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्यांना ऑफर देत आहेत. हा प्लेसमेंट ड्राइव्ह सुमारे ५ दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे आणि २०० हून अधिक कंपन्यांद्वारे विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत जॉब मिळण्याची अपेक्षा आहे.

 

 

मीडिया रिपोर्टनुसार प्लेसमेंट ड्राइव्हसाठी अनेक कंपन्या आणि मोठी नावं पुढे आली आहेत. यात मायक्रोसॉफ्ट, विप्रो, टाटा स्टील, जॅग्वॉर, गूगल, रिलायन्स, सॅमसंग, जियो 5G, OYO, फिल्पकार्ट, Amazon, Uber, Tata Consultancy Servics (TCS), Zomato आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे. बीएचयू प्लेसमेंट ड्राइव्ह इन्स्टिट्यूटच्या राजपूताना होस्टेल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. येथे सर्व आयोजक विद्यार्थी पूर्णवेळ काम करत आहेत. हे विद्यार्थी या संस्थेचे पैसे वाचवण्यासाठी दिवस-रात्र राबत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत: प्लेसमेंट सिस्टीम लावण्यापासून आयआयटी बीएचयूचं प्लेसमेंट पोर्टल तयार करण्यापर्यंत कामं केली आहेत. या प्लेसमेंट ड्राइव्हशी संबंधित माहिती उमेदवार अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

 

 

Advertisement

Advertisement