Advertisement

गेवराईत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा जप्त

प्रजापत्र | Friday, 26/11/2021
बातमी शेअर करा

गेवराई-सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर करवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या दोन हायवा पकडल्या, तसेच यावेळी लोकेशन देणार्‍यांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे.

            २५ नोव्हेंबर रोजी रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गेवराई हद्दीतील म्हाळस पिंपळगाव नदीमधून अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्वतः पंकज कुमावत व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी दि.25 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास म्हाळस पिंपळगाव फाट्यावरून लोकेशन देणारे तीन इसम, एक कार ताब्यात घेतली. तसेच वाळू भरण्यासाठी उपयोगात येणारे ट्रॅक्टर लोडर व दोन हायवा ताब्यात घेतले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर केले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सपोनि संतोष मिसले, उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, मारुती माने, पोलीस हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर ,विकास चोपणे, महादेव सातपुते रामहरी बंडाने, दिलीप गीते, सचिन आहकारे, राजू वंजारे, मतीन शेख हुंमबे, चालक सफो यादव, यांनी केलेली आहे.
 

Advertisement

Advertisement