Advertisement

जवाहरवाडीत भिषण आग

प्रजापत्र | Monday, 08/11/2021
बातमी शेअर करा

गेवराई-तालुक्यातील जवाहरवाडी शिवारात आज दुपारी अचानक भिषण आग लागली. या आगीत 20 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला आहे. हि आग शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या घर्षणाने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

 

 

 अंकुश बांगर, भाऊसाहेब बांगर, भगिनाथ बांगर, लक्ष्मण दाताळ, सुदाम चौधर, सुखदेव चौधर, गहिनीनाथ टेकाळे, शिवाजी गुजर, रामकिसन गुजर, गोव्हर्धन गुजर, राजाभाऊ गुजर या शेतकऱ्यांचा मिळून एकलगत जवळपास 20 एकर क्षेत्रावर ऊस आहे. दुपारी अचानक ऊसाला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. हि बाब लक्षात येताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग ऐवढी भिषण होती की, एकलगत असलेल्या वीस एकरावरील ऊस जळून खाक झाल्यानंतरच विझली. हि आग शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीचे घर्षणाने लागल्याचे सांगितले जाते. याबाबत माहिती मिळताच जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, तसेच पंचनामा केला आहे. दरम्यान या आगीत ऊस पुर्णतः जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

 

Advertisement

Advertisement