Advertisement

सोशल मीडियावर उघडले बनावट अकाउंट

प्रजापत्र | Sunday, 24/10/2021
बातमी शेअर करा

गेवराई-इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून एका अल्पवयीन मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सायबर कलमाखाली एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील एका अल्पवयीन मुलाने त्याच्या ओळखीच्या अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीच्या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट उघडले.यानंतर त्या मुलाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्यासोबत चॅटिंग करत त्या वेगवेगळे फोटो पाठवले.दरम्यान चॅट करणारी मुलगी नसून मुलगा असल्याचे कळल्यानंतर याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलावर सायबर कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार करीत आहेत .

Advertisement

Advertisement