Advertisement

स्पुटनिक व्ही’ लशीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका स्वयंसेवकामध्ये साइड इफेक्ट आढळून आले, अशी माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली. अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना असे या साइड इफेक्टचे स्वरुप होते.

‘द मॉस्को टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.स्पुटनिक व्ही’ लशीचे पहिल्या दोन फेजच्या चाचणीचे निष्कर्ष लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. पहिल्या दोन फेजमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर कुठलेही गंभीर साइडइफेक्ट आढळून आले नाहीत तसेच सर्व स्वयंसेवकांच्या शरीरात करोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असे लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. सध्या हजारो स्वयंसेवकांवर ‘स्पुटनिक व्ही’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे.

Advertisement

Advertisement