Advertisement

गेवराईत शासनाची तिरडी काढून शेतकरी संघटनेने आंदोलन

प्रजापत्र | Tuesday, 12/10/2021
बातमी शेअर करा

गेवराई : दि १२ ( वार्ताहार ) 
      शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात शेतकरी संघटनाच्या वतीने आज गेवराईत दसरा मैदानपासून ते तहसील कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शासनाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन तिरडी आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने गेवराई शहर दणाणून गेले होते.

 

     याबाबत सविस्तर वृत्त असे की, अतिवृष्टिमुळे शेतकरी पूर्ण उध्दवस्त झाला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पिक पाण्यात वाहून गेले आहे. शेतातील माती पावसाने वाहून गेली. त्यामुळे  शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, तरी देखील महाराष्ट्र सरकार याची कसलीच दखल घेत नाही. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झाले तरी देखील शासन कुठलीच नुकसान भरपाईची घोषणा करत नाही. पिकविमा मंजुर होवून वाटप करत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात तिव्र संताप असून आज दि. १२ मंगळवार रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शासनाचा प्रतिकात्मक पुतळा करुन त्याची तिरडी बनवून आंदोलन करण्यात आले. यावेळी
तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात रामेश्वर गाडे, सुभाष मायकर, अशोक हटवटे, अनुरोध काशीद, मिलिंद शिंदे, संपतराव कोथंबीर, मच्छिंद्र जगताप, परमेश्वर किशोरी, यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Advertisement

Advertisement