Advertisement

दिलीप भोसलेंसह एकाचा अपघाती मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 25/09/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यातील चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे तसेच शिव अंगणवाडी संघटनेचे मराठवाडा प्रमुख दिलीप भोसले आणि महेंद्र गायकवाड यांचा अपघाती मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि.24) मध्यरात्री घडली. पालीजवळ हा अपघात घडला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बीड तालुक्यातील पाली जवळ भीषण अपघातात
दोन ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली , यामध्ये बीडमधील सामाजिक कार्यकर्ते व शिव अंगणवाडी संघटनेचे मराठवाडा प्रमुख दिलीप भोसले आणि गायकवाड हे दोघे जण जागीच ठार झाले असून अन्य एक जखमी झाल्याची माहिती आहे.
MH–22 -5277 या क्रमांकाची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजका वर धडकल्याने हा अपघात झाला.   अंबाजोगाई येथून बीडकडे येत असताना हा अपघात झाला असून मागील काही महिन्यापूर्वी दिलीप भोसले यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आता दिलीप भोसले यांचाही अपघाती मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement