Advertisement

घोडका राजुरीमध्ये ६० लाखांचा गुटखा जप्त

प्रजापत्र | Wednesday, 15/09/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१५ (प्रतिनिधी)-तालुक्यातील घोडका राजुरी येथे एका गोदामावर छापा टाकून पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने सुमारे ६० लाखांचा गुटखा जप्त केला. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ही कारवाई करण्यात आली.
बीड- परळी मार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून १५ सप्टेंबर रोजी सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. एका ट्रक व एका टेम्पोतून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले. यावेळी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. गुटख्याचा अंदाजे ६० लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. गुटखा, दोन वाहने, दोन आरोपी असा सारा लवाजमा घेऊन पथक पिंपळनेर ठाण्यात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली.

Advertisement

Advertisement