Advertisement

रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू 

प्रजापत्र | Thursday, 02/09/2021
बातमी शेअर करा

 

 

केज – केज अंबाजोगाई रोडवरील होळ नजीक एका रुग्णवाहिकेने तरुणास धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२) रोजी सकाळी घडली आहे.
                 धारूर तालुक्यातील कारी येथील संतोष रामभाऊ मुजमुले (वय २७) हा तरुण होळ येथे मावशीकडे आला होता. सकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला बसला असताना त्याला रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात जबर जखमी झालेल्या संतोषचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका (A P २७ W ५०८८ ) रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

 

 

Advertisement

Advertisement