Advertisement

घरात घुसून महिलेवर अत्याचार

प्रजापत्र | Monday, 23/08/2021
बातमी शेअर करा

केज दि.२३ – तू शेतात ट्रॅक्टर का जाऊ दिले नाही असे म्हणत एका ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून बळजबरीने अत्याचार केला. तर आरोपीच्या भावाने व वडिलांनी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज शहरात २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघा बापलेकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
     धारूर तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय पीडित महिला ही केज शहरात वास्तव्यास असून ती २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी एकटीच होती. याचवेळी आरोपी संदीपान विश्वनाथ चौरे ( रा. चिंचपूर ता. धारूर ) हा तिच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने तू परवाच्या दिवशी माझे ट्रॅक्टर शेतातून जाऊ का दिले नाही असे म्हणत महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिलेच्या गालात चापटा मारून अत्याचार करून निघून गेला. त्यांनतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आरोपीचा भाऊ सुखदेव विश्वनाथ चौरे व त्याचे वडील विश्वनाथ निवृती चौरे हे दोघे पीडितेच्या घरी गेले. त्यांनी तु तुझ्या दिराला संदीपान चौरे याने बलात्कार केल्याचे का सांगितले. तु जर  संदिपानचे नाव घेतले तर तुला व तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाहीत. तु संदिपानचे नाव घेवु नको नाही, तर आम्ही तुझे का करायचे ते बघुन घेतो असे अशी जिवे मारण्याची पीडित महिलेला धमकी दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून संदीपान चौरे, सुखदेव चौरे, विश्वनाथ चौरे या तिघा बापलेकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पिंक पथकाच्या फौजदार सीमाली कोळी ह्या करीत आहेत.

Advertisement

Advertisement