Advertisement

केज - बीड रोडवर अपघात

प्रजापत्र | Monday, 16/08/2021
बातमी शेअर करा

केज दि.१६-  केज बीड रोडवरील उमरी फाट्या नजीक कार व मोटारसायकल चा अपघात होऊन यात एकाचा मृत्यू तर दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
      सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान केज बीड रोडवरील उमरी फाट्या जवळ कार व मोटारसायकलचा अपघात होऊन यात एका इसमाचा मृत्यू झाल्याची तर दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गंभीर बालकांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता प्रथोमोपचार करून त्यांना अंबाजोगाई ला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. परंतु एका बालकाचा अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात मृत्यू पावलेला इसम सय्यद नामक असून तालुक्यातील शिंदी या गावचे असल्याचे समजते.

Advertisement

Advertisement