Advertisement

मारहाण करून खिशातील पैसे काढून घेतले

प्रजापत्र | Sunday, 11/07/2021
बातमी शेअर करा

केज दि.११ - तु खव्याची भट्टी का चालवतोस ? अशी भांडणाची कुरापत काढून एका ६५ वर्षीय शेतकऱ्यास सखा भाऊ व दोन पुतन्यांनी लाकडी गंडक्याने पाठीत मारून दुखापत करीत खिशातील पाच हजार रुपये काढून घेतल्याची घटना केज तालुक्यातील ढाकणवाडी येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

       ढाकणवाडी येथील शेतकरी सुभाष साहेबराव ढाकणे ( वय ६५ ) हे १० जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे होते. याचवेळी त्यांचे भाऊ भास्कर साहेबराव ढाकणे, पुतणे प्रदिप भास्कर ढाकणे, सोनु भास्कर ढाकणे हे तिघे तिथे आले. त्यांनी तू खव्याची भट्टी चालवतोस, खव्यात मैदा टाकतोस अशी भांडणाची कुरापत काढुन सुभाष ढाकणे यांना शिवीगाळ करून लाकडी गंडक्याने पाठीत मारुन दुखापत केली. त्यांनी ओळखीचा फायदा घेऊन त्यांच्या शर्टच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घेतले. अशी फिर्याद सुभाष ढाकणे यांनी दिल्यावरून भास्कर ढाकणे, प्रदिप ढाकणे, सोनु ढाकणे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सानप हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement