Advertisement

अवजड वाहनाने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू.

प्रजापत्र | Wednesday, 23/06/2021
बातमी शेअर करा

 

 केज दि.२३ - नातेवाईकांना भेटून केजकडे परत निघालेल्या इसमाला नेकनूर जवळ एका अवजड वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनाने पुढच्या चाकाखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

           संजय मारुती राऊत (४३) रा.कानडी माळी ता.केज असे मयत इसमाचे नाव आहे. संजय हे चौसाळा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु दि.२२ राजी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान तिकिटाला पैसे नसल्याने नेकनूरहून गावाकडे परत पायी निघाले होते.

 

 

मात्र नेकनूर शेजारील पुलाच्या जवळ आले असता त्यांना (MH १६AY ५५३३या अवजड वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनाने  चिरडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर त्यांना नेकनूर च्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले असून तिथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. संजय यांच्या पश्चात, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement