Advertisement

सर्पदंशाने नवविवाहितेचा मृत्यु

प्रजापत्र | Friday, 18/06/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-शहरात जाधव गल्लीत एका घरात साप निघाल्यानंतर त्याने एका नवविवाहितेला दंश केल्याने प्रिया गणेश माने (वय-२५) हिचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.१८) पहाटे मृत्यु झाला.जैतापूर येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

             

 धारूर तालूक्यातील मुळ जैतापूर येथील रहिवाशी असणारे व सध्या धारूर शहरात कसबा विभागात जाधव गल्लीत राहणारी नवंविवाहित प्रिया गणेश माने (वय-२५) हिला घरातच आठ दिवसापूर्वी साप चावल्याने धारूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र प्रकृती खालावत असल्याने  अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान तिचे निधन झाले. दरम्यान तिच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून दोन वर्षाच्या आदीरा या तिच्यामुलीकडे पाहून सगळ्यांचे डोळे पाणावत होते.
 

Advertisement

Advertisement