Advertisement

सावरगाव नजीक ट्रकचा अपघात;चालक जखमी

प्रजापत्र | Monday, 07/06/2021
बातमी शेअर करा

  माजलगाव दि.७ (वार्ताहर)-शहरापासून काही अंतरावर असलेल्या सावरगाव नजीक ट्रकचा अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि.७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.यात ट्रक चालक जखमी झाला असून चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

 

           सावरगाव नजीक फारशीची वाहतूक करणारा एक ट्रक भरधाव वेगात जात होता.यावेळी रस्त्यावरील खड्यात ट्रकचे चाक गेल्यानंतर चालकाचे ट्रॅकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.यात चालक जखमी झाला असून सदरील ट्रक हा गुजरातहुन विजयवाडा याठिकाणी जात असल्याची माहिती आहे.दरम्यान अपघानंतर रस्त्यावर सर्वत्र फारशी पसरून फुटल्या होत्या.

Advertisement

Advertisement