Advertisement

सराफा हत्या प्रकरणातील आरोपीच्या मामाची आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 26/05/2021
बातमी शेअर करा

शिरूर दि.२६ (प्रतिनिधी) - येथील सराफा हत्या प्रकरणातील आरोपीच्या मामाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावत मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आदिनाथ धोंडीराम गायके नावाच्या २५ वर्षीय तरुणाने पोलिसांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रात्री शिरूर शहरात घडली. मयताच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या केवळ शिरूर पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप केला. मात्र पोलिसांनी हे आरोप धुडकावून लावले आज सकाळी आजिनाथ यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

गेल्या चार दिवसापूर्वी शिरूर येथील सराफाची प्री प्लॅन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी भैय्या गायकवाड हा फरार असून यातील अन्य दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. भैय्या गायकवाड याचा तपास करण्यासाठी पोलिस वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. त्याच्या शोधासाठी भैय्याचा मामा आदिनाथ धोंडीराम गायके (वय २५) यास चौकशीसाठी बोलून आपणास अपमानास्पद वागणूक देत त्याला मारहाणही केली गेली. यातूनच आजिनाथ गायके याने रात्री शिरूर येथील सलूनच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.सदरचा प्रकार हा रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणात शिरूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आज सकाळी मयत आदिनाथ यांच्या बहिणीने शिरूर पोलीसात येऊन तुमच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या भावाने आत्महत्या केल्याची तक्रार केली. मात्र अशी तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच बरोबर अजिनाथ गायके यास चौकशीसाठी बोलावले नसल्याचा दावाही शिरूर पोलिसांनी केला, मात्र गायके यांच्या नातेवाइकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आजीनाथने आत्महत्या केली आहे.

 

 

केवळ नातेवाईक आहे म्हणून संशय घेणं चुकीचं-धोंडे

 

आजिनाथ गायके या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आज माजी आ.भीमसेन धोंडे यांनी गायके कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना भीमसेन धोंडे म्हणाले की, आदिनाथ गायके यांनी रात्री आत्महत्या केली. पोलिसांच्या चौकशी मध्ये मारहाण केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. खरं पाहिलं तर आजीनाथ आणि त्या प्रकरणातील आरोपींचा काहीच संबंध नव्हता. केवळ नातेवाईक आहे म्हणून पोलिसांनी संशय घेऊन त्याला टॉर्चर करण हे चुकीच आहे. पोलिसांच्या या वागण्यामुळेच त्याने आत्महत्या केली आहे. ग्रामीण भागामध्ये पोलिसांच्या दंडुकशाहीला लोक घाबरतात.

Advertisement

Advertisement