Advertisement

२५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक

प्रजापत्र | Sunday, 16/05/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-येथील घाटातील २५० फूट खोल दरीत शनिवारी (दि.१६) रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान केज येथील येडेश्वरी कारखान्याची साखर घेऊन अहमदाबादकडे जाणारा ट्रक दरीत कोसळला.यात चालक गंभीर जखमी झाला आहे.त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयमध्ये पाठवण्यात आले आहे.    

              
 शनिवारी रात्री किल्लेधारूर येथील घाटात अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने साखर घेऊन जाणारे ट्रक (जी.यु. ३१००) हा २५० फूट खोल दरी मध्ये पलटी खात कोसळला. या ट्रकचा किन्नर अनिल पोगचिया यांनी उडी घेतली त्यामुळे तो बालबाल बचावला. तर ट्रक ड्रायव्हर वनरकक्षी महेंद्रसिंग चुवासमा वय ४० वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे. पाय मोडल्यामुळे तसेच अंगावरती इतर ठिकाणी दुखापत झाल्यामुळे चालकाला उठता देखील येत नव्हते. येथील सामाजिक कार्यकर्ते जयराम गायकवाड यांनी त्वरित मदत कार्य करत पत्रकार पोलीस व आरोग्य विभाग यांना याची माहिती दिली.

 

 

धारूर येथील दोनही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे तेलगााव येथील रुग्णवाहिका डॉ.एम.बी.गायकवाड,चालक बाळासाहेब बडे यांच्यासह लगेच उपलब्ध झाली.
पोलीस निरीक्षक सुरेखा धस व त्यांची टीम किल्लेधारूर घाटामध्ये दाखल होऊन त्यांनी दरीत कोसळलेल्या ट्रकच्या ड्रायव्हरला दोरीने ओढून वर काढत मदत कार्य केले. प्राथमिक उपचार करून चालकाला पुढील उपचारार्थ आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement

Advertisement