Advertisement

केज शहरात झालेल्या १७५ अँटिजन टेस्ट मध्ये १४ रुग्ण सापडले

प्रजापत्र | Saturday, 01/05/2021
बातमी शेअर करा

केज दि.१ - लॉक डाउन असतानाही विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना कितीही सांगितले तरी ऐकत नाहीत हे दिसून आल्यानंतर केजमध्येही अँटिजेन टेस्ट चा पर्याय अवलंबला होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या 175  टेस्ट मध्ये 14 नागरिक पॉजि टिव्ह आढळून आले.
            विकेंड लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर काल तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी शनिवारी आणि रविवारी विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन केले होते. मात्र ऐकतील ते लोक कसले ? आज सकाळ पासूनच लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर आले. मात्र अगोदरच तयारीत असलेल्या प्रशासनाने विनाकारण जे बाहेर येतील त्यांची टेस्ट आणि दंड करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये 14 नागरिक बाधित आढळून आले आहेत. सदरील बाधित आलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असून ह्या लोकांनी आणखी कितीजण बाधित केले आहेत हे समोर येणार आहे.
           यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, डॉ.दत्तात्रय चाटे यांच्यासह पोलीस कर्मचारी महादेव गुजर, शेख तसेच नगरपंचायत ची टीम कार्यरत आहे. सदरील मोहिमेमुळे कांही वेळात रस्ता ओस पडत असल्याचे चित्र दिसून आले.

Advertisement

Advertisement