Advertisement

केज शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट सुरू

प्रजापत्र | Saturday, 01/05/2021
बातमी शेअर करा

डी. डी. बनसोडे/केज

केज दि.१ - लॉक डाउन असतानाही विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना कितीही सांगितले तरी ऐकत नाहीत हे दिसून आल्यानंतर केजमध्येही अँटिजेन टेस्ट चा पर्याय अवलंबला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदरील मोहीम सुरू केली असून यामध्ये अनेकांची टेस्ट करण्यात येत आहे.
            विकेंड लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर काल तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी शनिवारी आणि रविवारी विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन केले होते. मात्र ऐकतील ते लोक कसले ? आज सकाळ पासूनच लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर आले. मात्र अगोदरच तयारीत असलेल्या प्रशासनाने विनाकारण जे बाहेर येतील त्यांची टेस्ट आणि दंड करायला सुरुवात केली.
         

 

 यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, डॉ.दत्तात्रय चाटे यांच्यासह पोलीस कर्मचारी महादेव गुजर, शेख तसेच नगरपंचायत ची टीम कार्यरत आहे. सदरील मोहिमेमुळे कांही वेळात रस्ता ओस पडत असल्याचे चित्र दिसून आले.

Advertisement

Advertisement