Advertisement

स्वाराती' ला मिळणार तीन एमआरआय मशीन

प्रजापत्र | Wednesday, 28/04/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई -कोरोना विरुद्ध दोन हात करतच, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. स्वाराती रुग्णालयास काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या 3 टेस्ला एम आर आय मशीन खरेदी करण्यासाठीची १६ कोटी १५ लाखांची खरेदी ऑर्डर बुधवारी (दि.२८) हाफकीन संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
                एमआरआय मशीन, टर्न की ट्रान्सफॉर्मर युनिट खरेदी करणे, अंबाजोगाई येथे पोहोच करून मशीन इन्स्टॉल करून देणे ही जबाबदारी या ऑर्डरनुसार फिलिप्स या पुरवठादार कम्पनी कडे सोपविण्यात आली असून, ही सर्व प्रक्रिया साधारणतः ५० दिवसांच्या आत पूर्ण केली जाईल अशी माहिती स्वाराती चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे. 
एमआरआय करण्यासाठी या भागातील नागरिकांना हजारो रुपये खर्चून अन्य शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी ना.धनंजय मुंडे यांनी हाफकीन मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे एम आर आय मशीनसाठी सातत्याने पाठपुरावा केला. विभागाने सुरुवातीला १.५ टेस्ला मशीन खरेदीस परवानगी दिली होती, परंतु धनंजय मुंडे यांनी अद्ययावत प्रणालीच्या ३ टेस्ला मशीनचा आग्रह केला. अखेर ही मशीन खरेदी केली जात असून, ही मशीन बसविण्यासाठीच्या जागी आवश्यक सुविधा निर्माण करून ५० दिवसांच्या आत ती बसविण्यात येईल, तसेच या एमआरआय मशीनला ऑपरेट करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्यात येईल, कमी वेळेत मशीन उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार, अशी प्रतिक्रिया डॉ. सुक्रे यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement