Advertisement

भर रस्त्यावर आढळला महिलेचा मृतदेह

प्रजापत्र | Sunday, 25/04/2021
बातमी शेअर करा

केज दि.२५ - केजपासून अवघ्या सात ते आठ किमी अंतरावर केज कळंब रोडवर असलेल्या साळेगाव नजीक एका महिलेचा मृतदेह राज्य रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

            साळेगाव नजीक असलेल्या कळंब कडे जाणाऱ्या पुलाजवळ एका अंदाजे 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. सदरील महिलेच्या तोंडावर तीक्ष्ण हत्याराचे वार दिसत असून बाजूला मिरचीची पूड तसेच एक घड्याळ पडल्याचे निदर्शनास आले आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत तिथे असल्याचे सांगितल्या जातात असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
           दरम्यान घटनास्थळी केज पोलिसांनी धाव घेतली असून भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

 

Advertisement

Advertisement