Advertisement

माजलगाव तालुक्यात विशेष पोलीस पथकाची धाड

प्रजापत्र | Wednesday, 31/03/2021
बातमी शेअर करा

माजलगाव दि.३१ - तालुक्यातील पिंपळगाव शिवारातील एका मोकळ्या जागेत झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्याना पकडून सदर ठिकाणावरून 416200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरील कारवाई बीड जिल्हा विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी केली.
             विशेष पथकाला सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव शिवारात एका झाडाखाली जुगार खेळल्या जात असल्याची माहिती विशेष पथकाला माहिती होताच. पथक प्रमुख विलास हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि.30 मार्च रोजी सदरील ठिकाणी धाड टाकली. यावेळी गणेश रामकिसन गोरे रा.पिंपळगाव, अलीमोदीन शिराजोदीन रा.सोमठाणा, चुनुखां नुरखां पठाण रा.पिंपळगाव, कृष्णा शेषेराव कांवळे रा. पाथरी, नवनाथ हरीभाऊ लिंबोरे रा. सोमठाणा, राजेश विश्वनाथ कांबळे रा.गौतमनगर पाथरी, फेरोजखाँन फक्तेखॉन पठाण रा.सोमठाणा, रुस्तुमखान दौलतखॉन रा.सोमठाणा, प्रभाकर सखाराम जाधव रा. चिंचोली, डिगांबर सिताराम मुळे रा. रामपुरी ता. माजलगाव, सिद्यीखॉन लालखान पठाण रा.सोमठाणा, अंगद विष्णु शिंदे रा. ढालेगाव, विलास गणपतराव सोळंके रा.गंगामसला, प्रकाश बाबासाहेब शेजुळ रा.आबेगाव हे विनापरवाना बेकायदेशीर तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. सदरील ठिकाणी जुगाराचे साहीत्य व नगदी 52200/-रु, मोबाईल हॅन्डसेट अंदाजे किंमत 24000/-रु व आरोपीने जुगार खेळणे कामी येजा करणे करीता आणलेली वाहने. ज्यामध्ये मोटारसायकल किंमत-340000/-रु असा एकुण-416200/-रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पोलीस शिपाई पठाण सादिक शमशेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement